मित्रानो स्वागत आहे agrischeme.co.in मध्ये. आजच्या या लेखात आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना २०२३ याबद्दल माहिती बघणार आहोत. तशी हि योजना हि खूप जुनी आहे परंतु आपण या लेखात हि योजना आपल्या चालू वर्षात म्हणजेच २०२३ – २०२४ मध्ये आपल्या कशी कशी उपयोगी पडू शकते आणि त्यासाठी या yashawantrao chavhan mukt vasahat (gharkul) yojna ची काय उद्दिष्ट, अटी, लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया, GR, इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
मित्रानो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना हि समाज कल्याण विभागामार्फत भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाते. या योजनेचा उद्देश भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना तसेच अपंगांना, विधवा स्त्रिया, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचावे आणि त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हि योजना राबविली जाते.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनेचे उद्देश
मित्रानो हि योजना समाजकल्याण विभागामार्फत राबवली जात असून या योजनेचा उद्देश हा भटक्या आणि विमुक्त जमातीच्या लोकांचे जीवनमान उंचावणे, भटक्या विमुक्त जमातीचा विकास करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून मुख्य प्रवाहात आणणे असा आहे. बऱ्याचदा अशा प्रकारच्या योजना या शासनातर्फे राबविल्या तर जातात परंतु त्या ज्या सामाजिक घटकासाठी राबविल्या जातात त्यांच्यापार्यत पोहचत नाही आणि त्यामुळे समाजातील काही घटक यासारख्या चांगल्या योजनांपासून आणि अश्या याजानांच्या लाभापासून वंचित राहतात.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनेच्या लाभार्थांसाठी काही महत्वाचे
yashawantrao mukt vasahat yojana हि मुख्यता ग्रामीण भागासाठी बनवली गेली आहे. या योजनेसाठी काही प्रमाणात किवा सर्व प्रमाणात रमाई आवास योजनेचे निकष लागू होत असून त्यासाठी तुम्ही खालील निकष हे पूर्ण केले पाहिजे.
- जर लाभार्त्याची जमीन हि शासनाने किवा सक्षम प्रधीकाऱ्याने उपलब्द करून दिले असल्यास त्या लाभार्त्यास रमाई आवास योजनेच्या निकषाप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेसाठी दुसरा निकष म्हणजे कि जर जमीन हि लाभार्थ्याची स्वताःची असेल तर त्याला वरील निकषाप्रमाणे त्या जागेवर घर बांधून देण्यात येईल. आणि घराचा आराखडा हा रमाई आवास योजनेप्रमाणे राहील.
टीप: सदरची रमाई आवास योजना हि अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध या घटकांसाठी शासनाद्वारे राबविण्यात येते.
मुक्त वसाहत योजनेच्या लाभाचे स्वरूप काय असेल
तसेच या योजनेसाठी पात्र झालेले (भटक्या आणि विमुक्त जमातीचे कुटुंब) लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ गुंठे जमीन व यावर २६९ चौरस फुटाचे घर बांधून दिले जाते. आणि शिल्लक राहिलेल्या जमिनीवर लाभार्थी कुटुंबासाठी शासनाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्द करून दिली जाते. त्याचप्रमाणे खालील निकषसुद्धा लक्षात घेतले जातात.
लाभार्थी पात्र झाल्यानंतरच्या शर्ती
- लाभार्त्याने त्याला भेटलेला भूखंड हा कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही.
- लाभार्थ्याने त्याला भेटलेला भूखंड कुणालाही विकता येणार नाही.
- लाभार्थ्याने त्याला भेटलेला भूखंड कुणालाही भाडेतत्वावर देता येणार नाही.
- या योजनेसाठी दर वर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येकी तीन गावे निवडून त्या गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
या योजनेचा लाभ कोणाला मिळेल
- जे लोक गावोगावी जाऊन भटकंती करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- महिला
- अपंग
- पूरग्रस्त क्षेत्र
- विधवा स्त्रिया
- BPL(जे लोक Below Poverty line मध्ये येतात)
आणखी वाचा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी (योजना पोकरा) योजना मराठी 2023
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या अटी
- एक लाखापेक्षा कामी वार्षिक उत्पन्न असणारे कुटुंब या याजानेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ ज्याला मिळवायचा आहे त्याच्याकडे स्वतःचे घर नसावे.
- लाभ घेणारा हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा.
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराने या आधी राज्यातील कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार यांच्याकडे स्वतःच्या मालकीचा कुठलीही जमीन किवा भूखंड नसावा.
- या योजनेसाठी कुटुंबातील कुणाही एकाच सदस्याला योजनेचा लाभ मिळेल.
- अर्जदार हा किमान सहा महिने एकाच ठिकाणी वास्तव्याला हवा.
- हि योजना फक्त ग्रामीण भागासाठी लागू आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- उतपान्नाचा दाखला (एक लाख रुपये पेक्षा कामी उत्पन्न असल्याचा)
- भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र
- Domicile certificate (महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र)
- १०० रुपयाच्या stamp पेपर वर शपथपत्र (कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे)
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना २०२३: कार्यान्वयन
- योजना कार्यान्वयित करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या आद्यक्षतेखाली समिती स्थापन करून योजनेसाठी सरकारी जमिन निश्चित करणे.
- योजनेसाठी सरकारी जमीन उपलब्द नसल्यास घरकुल योजनेसाठी जमिनीच्या किमती ठरवून जमिनीचे अधिग्रहण करणे.
- लाभार्त्याच्या अर्जाचा विचार करून अर्जदाराची निवड करणे आणि त्यांनी या आधी कुठल्याही घरकुल योजनेचे लाभ घेतलेला नाही याची खात्री करणे.
- या योजनेसाठी जेथे जमीन उपलब्द झाली असेल तेथे पायाभूत सुविधांची जसे कि रस्ते, पाणीपुरवठा, गटार, इत्यादीची उपलाब्द्ता करून देणे.
- तसेच त्या जमिनीवर घरांसाठी layout तयार करून घरांची बांधणी करणे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना २०२३: अर्ज कोठे करावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या समाजकल्याण कार्यालयाला भेट द्यावी.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना २०२३ pdf
pdf साठी येथे click करा
अधिक माहितीसाठी खालील video बघा.
1 thought on “यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना २०२३: संपूर्ण माहिती”