नमस्कार! शेतकरी मित्रानो तुम्हाला माहिती आहे का कि आता तुषार सिंचन व ठिबक सिंचन अनुदान आता झाले आहे 80%. मित्रानो ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ला एकरी अनुदान किती मिळते? हा एक सततचा विचार ला जाणारा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो याच्याच संदर्भात सविस्तर अशी माहिती ज्याच्या मध्ये नेमकं तुम्हाला किमान किती क्षेत्रासाठी ठिबक सिंचन अनुदान मिळते हे आपण आज बघणार आहोत. एक भारतीय शेतकरी म्हणून, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पिकांसाठी पाणी किती महत्त्वाचे आहे. आपल्या वैविध्यपूर्ण आणि कृषीदृष्ट्या समृद्ध राष्ट्रामध्ये, आपल्याला हिवाळ्याच्या महिन्यांत दंव पडण्याच्या धोक्यासह विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. तथापि तुषार सिंचन या तंत्रज्ञानामुळे शेतकरी बांधव या सर्व धोक्यांपासून आपल्या पिकांचा बचाव करू शकतात. त्यासोबतच तुषार सिंचन याबद्दल आपण शासनाच्या योजना, त्यासाठी असणारे अनुदान, तुषार सिंचनाची किंमत, तुषार सिंचनाचे फायदे, तोटे, तसेच त्यासाठी लागणारा अर्ज, कागदपत्रे याबद्दल माहिती बघणार आहोत.
मित्रानो ज्यांना तुषार सिंचन म्हणजे काय? हे माहिती नाही त्यांना आम्ही सागू इच्छितो कि तुषार सिंचन दुसरे तिसरे काही नसून हे एक तंत्राद्यान आहे ज्याच्या मदतीने आपण पी.व्ही.सी. पाईप ला नोझल लाऊन पाण्याच्या दबावाचा वापर करून पावसाप्रमाणे पिकांवर पाणी फिवार्ण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतो.
तुषार सिंचन फायदे
१) तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पिकांना योग्य पद्धतीने पाणी मिळून पाण्याचा विपर्यास होत नाही.
२) पारंपारिक सिंचन पद्धतीपेक्षा तुषार सिंचनाचा वापर केल्याने पिकांसाठी आवश्यक सिंचन क्षमतेमध्ये वाढ होते.
३) तुषार सिंचन ह्या तंत्रज्ञानाचा वापर हा सर्व पिकांसाठी होऊ शकतो.
४) तुषार सिंचानाबद्दल सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याची २५ ते ३५ बचत होते.
५) तुषार सिंचन एक विकसित तंत्रज्ञान असल्याने पिकांना पाणी देताना त्याची समप्रमाणात वाटणी करणे शक्य होते.
६) तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा आपण पिकांना कितीही पाणी देऊ शकतो.
७) तुषार सिंचन तंत्रज्ञानामुळे पाणी हे पिकांवर पावसा सारखे पडते त्यामुळे पिकांवर असणारे कीड रोग हे धूऊन जातात.
८) या पद्धतीच्या वापरामुळे पिक स्वच्छ राहते.
९) तुषार सिंचनाच्या वापरणे शेतकऱ्यांना पिकांसाठी रासायनिक खाते हे तुषार सिंचनाच्या माध्यमातून देता येतात पर्यायाने खताचा योग्य वापर होऊन बचत होते व त्याची कार्यक्षमता वाढते.
१०) या पद्धतीचा वापर प्रत्येक शेतकर्याने केला पाहिजे जेणे करून त्यांचा खर्च कामी होऊन उत्पादन वाढेल.
११) या पद्धतीच्या वापरणे पिकांचे उत्पादन १२ ते २० टक्क्याने वाढते.
तुषार सिंचन संच किंमत
साधारणतः तुषार सिंचन संच हा शेतकर्यांना विकत घ्यायचा असल्यास त्याची किम्मत साधारणतः ७०००
/- ते ८०००/- दरम्यान असू शकते. ज्यामध्ये 1.25” चे रेन गन नोझल, एक गण स्टँड, एक सर्व्हिस सॅडल / फूट-बॉटम, एक प्रेशर मीटर, प्रेशर मीटर कॉक असे एकूण पाच गोष्टी मिळतात.
टीप: तुषार सिंचनाची किमत हि कंपनी आणि त्याच्या quality वर अवलंबून असते ज्याचे भाव हे सातत्याने कामी जास्त होत असतात. आणि ग्राहकांनी ते भावाची खात्री झाल्यावरच खरेदी करणे उचित असते.
तुषार सिंचन अनुदान २०२३
महाराष्ट्र सरकारचे पोर्टल महाडीबीटी योजने नुसार आता ठिबक व तुषार सिंचन यांचे अनुदान वाढले आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांना तुषार व ठिबक सिंचन संच घेण्यासाठी अनुदान दिले जाते याची माहिती असेलच. आणि त्यासाठी बरेच शेतकरी बांधवांना ठिबक व तुषार संच खरेदी करण्याची इच्छा असेल त्यासाठीच आम्ही आपल्यासाठी तुषार व ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती खाली देत आहोत.
ठिबक व तुषार सिंचन अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे देण्याचा निर्णय.
- शेतकरी मित्रानो मागे २०१७ मध्ये केंद्र सरकारने याबाबत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या त्यानुसार अल्प व अत्यल्प शेतकरी बांधवांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ५५% येव्हडे अनुदान व इतर शेतकर्यांना ४५% मिळत होते व त्त्यासाठी जमीन धारणा मर्यादा हि ५ हेक्टर एव्हडी होती.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत बदल व्हावा आणि त्यांची आर्थिक परिस्थिती साधारावी यासाठी सरकारने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना याद्वारे ठिबक व तुषार सिंचन योजनेचा शेतकर्यांना लाभ व्हावा म्हणून अधिकचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- त्यासाठी शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेच्या अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अशी जे ५५% अनुदान मिळायचे त्यामध्ये अजून २५% अनुदानाची वाढ केली आहे म्हणजेच आता ठिबक व तुषार सिंचनावर मिळणारे अनुदान हे एकूण ८०% झाले आहे.
- तसेच इतर शेतकऱ्यांना आधी मिळणाऱ्या ४५% अनुदानात शासनाने अजून ३०% वाढ केली आहे म्हणजेच हे अनुदान आता ७५% एवढी वाढ झाली आहे. आणि या अनुदानासाठी शेतकर्यांसाठी पात्रता म्हणजे शेतकर्यांकडे कमीत कामी ५ हेक्टर एवढी क्षेत्र मर्यादा शासनाने घालून दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण माहिती हि महासंवाद या शासनाच्या अधिकृत website वर देण्यात आली आहे.
ठिबक व तुषार सिंचन अनुदानासाठी पात्रता
खाली दिलेल्या प्रत्रता यादी प्रमाणे लाभार्थी शेतकरी हे अनुदानासाठी पात्र असतील.
- लाभार्थी शेतकरी बांधवांकडे आधार कार्ड असणे गरजेचे.
- तसेच ७/१२ व ८-अ प्रमाणपत्र असणे सुद्धा गरजेचे.
- लाभार्थी शेतकरी बांधव हा जर SC किवा ST या category मधील असेल तर जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
आणखी वाचा : Banana Ripening Chamber Subsidy in Marathi – प्रकल्पाच्या खर्चाच्या 50% subsidy
ठिबक व तुषार सिंचन अनुदानासाठी असा करा ऑनलाइन अर्ज.
- सर्वात प्रथम google वर जाऊन टाइप करा mahadbt portal farmar login.
- त्यानंतर तुमच्या समोर mahadbt portal open होईल.
- त्यानंतर register या बटनावर click करून register करून घ्या.
- त्यानंतर तुमच्या समोर एक लिंक open होईल, “अर्ज करा” या बटनावर click करा.
- त्यानंतर तुम्हांला सिंचन साधने व सुविधा असा पर्याय दिसेल त्यावर click करा.
- सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर click केल्यानंतर एक form open होईल त्यामध्ये योग्य ती भरा.
- त्यानंतर sabmit या बटनावर click करा.
- त्यानंतर अर्ज परत एकदा बघून बघून बरोबर असल्याची खात्री करा.
ठिबक व तुषार सिंचन अनुदानासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत
- सर्वप्रथम payment करा या बटनावर click करा.
- त्याठिकाणी payment करण्याचे बरेच option तुम्हाल दिसतील.
- त्यापैकी कुठलेही एक जे तुम्हाला सोयीस्कर असेल तो पर्याय निवडा आणि payment करा.
- Payment यशस्वी झाल्यावर त्याची प्रिंट घ्या.
अशा प्रकारे ठिबक व तुषार सिंचन अनुदानासाठी आपण online अर्ज करू शकतो.
केंद्र सरकारच्या माध्यमातून तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन यासाठी किती अनुदान मिळते?
मित्रांनो राज्या मध्ये वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचनला अनुदान दिलं जातं. काही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. काही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. या योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकर्यांना, अत्यल्प भूधारक शेतकर्यांना महिला शेतकरी, विधवा, शेतकरी अशा वेगवेगळ्या एससी एसटी प्रवर्गातील शेतकरी 55 टक्के अनुदान हे ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी दिलं जातं. याच्या व्यतिरिक्त जे भूधारक शेतकर्यांची पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे, अशा शेतकर्यांना मात्र 45 टक्के अनुदान दिलं जातं.
राज्य सरकारच्या माध्यमातून तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन यासाठी किती अनुदान मिळते?
आता यामध्ये जे केंद्र सरकारचे अनुदान आहे याला पूरक म्हणून आपण जर पाहिले तर राज्य शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचन तुषार सिंचना चा जास्तीत जास्त वापर व्हावा. शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते. ज्याच्या अंतर्गत अल्प अत्यल्प भूधारक शेतकर्यांना 25 टक्के आणि भूधारक शेतकर्यांना 30 टक्के अस पूरक अनुदान दिलं जातं आणि एकंदरीत केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची योजना असे म्हणून ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी अल्प अत्यल्प भूधारक शेतकर्यांना पाच एकर पर्यंत जमीन असलेल्या सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान आणि जे भूधारक शेतकरी आहेत, अशा शेतकर्यांना 75 टक्के अनुदान दिलं जातं.
आणखी वाचा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (योजना पोकरा) योजना मराठी 2023 | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी, लाभार्थी
तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन यासाठी अनुदान वाटपाची पद्धत
आता हे अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी वितरित झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरण झाल्यानंतर पूरक अनुदान म्हणून दुसर्या टप्प्या मध्ये वितरीत केले जातात. प्राथमिक रित्या अनुदान वितरीत करत असताना सुद्धा बर्याच जणांना प्रश्न पडला आहे की नेमका अनुदान वितरीत कसं केलं जातं? यामध्ये 20 गुंठ्याला किती मिळतो? एक एकरला किती मिळत आणि एक हेक्टर ला किती मिळत? तुषार मध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान कसं मिळतं? मित्रांनो एकंदरीत या अनुदान वितरीत करत असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून 20 गुंठे, एक एकर, एक हेक्टर, पाच हेक्टर, प्रत्येक प्रवर्गानुसार प्रत्येक वेगवेगळ्या साईज नुसार एक प्रकल्प खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत असलेल्या प्रकल्प खर्चाच्या 80 टक्के 75 टक्के अशा प्रमाणामध्ये अनुदान दोन टप्प्या मध्ये वितरित केला जात.
तुषार सिंचन यासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा
अ. क्र. | अंतर (मि. मी. मध्ये) | क्षेत्र 0.2 हे. | क्षेत्र 0.4 हे. | क्षेत्र 1 हे. |
1 | 1.2*0.6 | 31436 रु | 57249 रु | 127501 रु |
2 | 1.8*0.6 | 24569 रु | 42992 रु | 91560 रु |
3 | 1.5*1.5 | 28106 रु | 46595 रु | 97245 रु |
4 | 3*3 | 15792 रु | 26190 रु | 47751 रु |
आता यामध्ये प्रकल्प खर्च मर्यादा जी आहे. त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचनच जर पाहिलं तर सिंचन मध्ये पहिला प्रकार आहे. 1.2 मीटर गुणिले. 0.6 मीटर यामध्ये 20 आर साठी म्हणजे अर्धा एकरसाठी ₹31,436 एवढय़ा प्रकल्प खर्च आहे. एक एकर साठी 57,241 आणि एक हेक्टर साठी ₹1,27,501 हां याच्या मधला प्रकल्प खर्च आहे. आता या प्रकल्प खर्चा च्या 80 टक्के अल्पभूधारक शेतकर्यांना आणि भुधारक शेतकरयां ना 75 टक्के अशा प्रमाणा मध्ये अनुदान वितरित केले जातात. आता यामध्ये दुसरी साईज आहे. 1.8 मिटर × 0.6 मीटर ज्याच्या साठी. अर्ध्या एकर साठी 24,569 एक एकर साठी ₹42,992, तर एक हेक्टर क्षेत्रासाठी ₹91,560 म्हणजे आपण पाहू शकता. जसे साइज चेंज होईल तसा अनुदान यामध्ये प्रकल्प खर्च यामध्ये कमी होत चालले आहे. 1.5 मीटर गुणिले 1.5 मीटर साठी 20 गुंठ्या साठी ₹28,106 एक एकर साठी ₹46,995, तर एक हेक्टर साठी ₹97,245 आता यामध्ये चौथी साईझ आहे. तीन मीटर बाय तीन मीटर ज्याच्या साठी अर्धा एकर साठी. ₹15,712 एक एकर साठी ₹26,189, तर एक हेक्टर साठी ₹47,751 रुपये. आता त्याच्या मध्ये तुम्ही ज्या प्रकारानुसार तुमचा ठिबक सिंचन सिलेक्ट कराल त्या प्रकारानुसार तुम्हाला हे अनुदान कमी जास्त येणार आहे. आता एखाद्या 1.8 सिलेक्ट केलं तर त्याला मिळणारे एकरी अनुदान वेगळा असणार आहे. आणि 1.2*0.6 मीटर केलं तर त्याला मिळणारे अनुदान हे वेगळे असणार आहे.
ठिबक सिंचन यासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा
पाइपचा व्यास (Pipe Dia.) मि. मी. मध्ये | |||
क्षेत्र | 63 | 75 | 90 |
0.4 हे. पर्यंत | 13211 रु | लागू नाही | लागू नाही |
1 हे. पर्यंत | 21500 रु | 24194 रु | 0 |
2 हे. पर्यंत | 31167 रु | 34657 रु | 0 |
3 हे. पर्यंत | लागू नाही | लागू नाही | 46779 रु |
4 हे. पर्यंत | लागू नाही | लागू नाही | 58995 रु |
5 हे. पर्यंत | लागू नाही | लागू नाही | 66789 रु |
मित्रांनो याप्रमाणे तुषार सिंचन मध्ये आपण जर पाहिला होता. तीन प्रकारां मध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे, ज्या मध्ये 63 मिलिमीटर. 75 मिलिमीटर आणि 90 मिलीमीटर अशा तीन प्रकारां नुसार त्याच्या पाइप साईझ नुसार हे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. एक एकर पर्यंत आपण जर पाहिले होते. एक एकर पर्यंत क्षेत्र धारणा असल्यास 63 मिलिमीटर च्या पाइपा साठी ₹13,211 आणि 75 आणि 90 मिलिमीटर चा पाइप हा एक एकर पर्यंत मिळत नाही. आता एक हेक्टर पर्यंत आपण जर पाहिला होता. 63 मिलिमीटर च्या पाइप साठी 21,588 75mm च्या पाइप साठी 24,194 रुपये 90 मिलीमीटर आहे. एक हेक्टर पर्यंत दिला जात नाही. दोन हेक्टर पर्यंत दिला जात नाही. दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असेल तर त्याच्या साठी 31,167 63 मिलिमीटर साठी आणि 75 मिलिमिटर साठी ₹34,657. आता तीन हेक्टर पासून पाच हेक्टर पर्यंत 63 आणि 75 मिलिमीटरच अनुदान मिळत नाही. यामध्ये डायरेक्ट्ली 90 मिलिमीटर साठी ते प्रकल्प खर्च दिला जातो. ज्याच्या मध्ये 46,779 तीन हेक्टर पर्यंत चार हेक्टर मर्यादा असेल तर चार हेक्टर साठी प्रकल्प खर्चा असतो. ₹58995 आणि पाच हेक्टर पर्यंत क्षेत्र असेल तर ₹66,789. आणि या प्रकारां नुसार जे वर्गवारी असेल जे कास्ट असेल किंवा अल्प अत्यल्प भूधारक त्याच्या प्रमाणा नुसार 80 टक्के 75 टक्के या प्रमाणा नुसार ते अनुदान वितरीत केले जातात. मात्र त्याच्या मध्ये 80 टक्के 75 टक्के मध्ये अनुदान तुम्हाला 80 टक्के 75 टक्के दिले जातात. परंतु केंद्र शासनाच्या आले ला निधी आल्यानंतर पहिले 55 टक्के आणि त्याच्या नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान दिल्यानंतर उर्वरित 25 टक्के अशा दोन्ही टप्प्या मधून दोन्ही निधी मधून तुम्हाला 80 टक्के अनुदान दिलं जातं.