पीएम किसान सम्मान निधी योजना २०२३: १३वा हप्ता जाहीर

पीएम किसान सम्मान निधी योजना ही 100% केंद्र सरकार पुरस्कृत आहे आणि आत्ताच पीएम किसान सम्मान निधी योजना २०२३: १३वा हप्ता जाहीर जाहीर होणार आहे अश्या बातम्या येऊ लागल्या आहेत. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनातर्फे रबवली जाते. या योजनेची सुरुवात ही 1 डिसेंबर 2018 पासून झाली आहे. या योजनेंतर्गत, 2 हेक्टरपर्यंतची एकत्रित जमीन किंवा मालकी असलेल्या लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6 हजार/- रुपये इतका आर्थिक आधार केंद्र शासनामार्फत दिला जातो. तसेच या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम म्हणजेच 2000/-  रुपये प्रमाणे ही तीन टप्प्यामध्ये  लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

पीएम किसान सम्मान निधी योजना २०२३ १३वा हप्ता जाहीर

या योजनेसाठी कुटुंबची किंवा परिवारची  यांची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले या पद्धतीने केलेली आहे. पीएम सन्मान निधी अंतर्गत मिळालेला लाभ हा डायरेक्ट टॅक्स बेनिफिट द्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. या लेखात आम्ही आपल्याला पी एम किसान सन्मान निधीशी संबंधित सर्व माहिती जसे की पी एम किसान योजनेचा हप्ता, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोठे करावा, ई के वाय सी, आणि या योजनेची सध्याची परिस्थिती काय आहे, इ. सांगणार आहोत.

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2023: उद्देश

भारत एक कृषी प्रधान देश आहे आणि भारतातील ७५% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. आपल्या या देशात सगळेच शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या हे शेतीवर अवलंबून आहेत आणि याच गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी या योजनेला सुरवात केली. या योजनेतून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले जीवनमान प्रदान करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

काय आहे pm kisan samman nidhi yojna 2023?

प्रधानमंत्री  किसान सम्मान निधी योजना ही भारत सरकार तर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेलं एक पाऊल आहे. ज्याद्वारे मध्यमावर्गीय आणि सीमांत शेतकऱ्यांना भारत सरकार या योजने अंतर्गत वार्षिक 6000/- रुपयाची आर्थिक मदत करते. या योजनेची सुरुवात ही 1 फेब्रुवारी 2019 ला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याद्वारे 2019 मध्ये भारताच्या आंतरिम केंद्रीय बजेट मध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000/- करोड रुपये एव्हडी रक्कम उपलब्ध करून दिली आहे.

या योजनेच्या दिशानिर्देशना अंतर्गत देशातील सर्व राज्य सरकारे आणि सर्व केंद्र शासित प्रदेश या योजनेसाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यतेसाठी पात्र लाभार्थी कुटुंबाची निवड करतील. आणि त्यानंतर ही संबंधित सरकारे या योजनेसाठी केंद्र सरकार तर्फे उपलब्ध झालेली रक्कम (direct bank transfer) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करतील.

Pm Kisan Samman Nidhi 2023 साठी पात्रता

कुठंल्याही सरकारी योजनेचा लाभ देण्या अगोदर सरकार हे त्या योजनेसाठी काही मापदंड आणि लाभार्थ्यांसाठी पात्रता निश्चित करत असते आणि याच्या आधारेच लाभार्थ्यांना योजनेचे लाभ दिले जातात. Pm किसान निधी योजनेसाठी जे छोटे आणि सीमांत शेतकरी भारताचे नागरिक आहेत त्यांनाच या योजनेसाठी पात्र समजण्यात येते. तसेच सर्व भूधारक कुटुंब ज्यांच्या नावे शेत जमीन आहे आणि जी शेती करण्यायोग्य आहे असे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. पुढे काही मुद्दे दिले आहेत.

  • या योजनेसाठी वर सांगितल्याप्रमाणे लाभार्थी शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.
  • लाभार्थी हे छोटे आणि सीमांत शेतकरी असायला हवेत, ज्यामध्ये पती, पत्नी, आणि अल्पवयीन मुलांचा समवेश होतो. आणि एकदा योजनेचा लाभ घेतलेले कुटुंब (पती, पत्नी, आणि अल्पवयीन मुले) परत स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याकडे 2 हेक्टर एव्हडी जमीन असायला हवी आणि त्या जमिनीचा वापर हा शेतीपयोगी कार्यासाठी व्हायला हवा. तसेच शेतजमीन ही शहरी क्षेत्र किंवा ग्रामीण क्षेत्र यापैकी कुठेही असेल तरी या योजनेचा लाभ मिळू शकतो.

या योजनेसाठी कोणी पात्र नाहीत

  • जे संस्थात्मक जमीन धारक आहेत ते या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • खालील पैकी एक किंवा अधिक श्रेणिमध्ये येणारी शेतकरी कुटुंबे ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • ज्या शेतकरी कुटुंबातील लोक संविधानिक पदावर आधी होते किंवा सद्या कार्यरत आहेत असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • तसेच राज्यांचे मंत्री किंवा केंद्राचे मंत्री राहिलेले लोक किंवा सद्या मंत्री म्हणून कार्यरत असलेले लोक तसेच राज्यसभा तसेच लोकसभेचे मेंबर असलेले किंवा राहिलेले लोक, तसेच राज्य विधान मंडळ आणि विधान परिषदेवर कार्यरत असलेले लोक, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये असलेले सदस्य या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.
  • तसेच केंद्र व राज्य सरकार यांचे मंत्रालयातील कर्मचारी, सर्व विभागातील कर्मचारी तथा सेवा निवृत्त अधिकारी, तसेच जे कर्मचारी राज्याच्या किंवा केंद्राच्या सार्वजनिक अथवा संलग्न उपक्रमाशी निगडित आहेत. जसे की महामंडळ इ. (Multi tasking staff, चतुर्थ श्रेणी, group D सोडून) या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • सर्व रिटायर्ड पेन्शन धारी ज्यांची मासिक पेन्शन 10000/- रुपये किंवा त्या पेक्षा जास्त आहे असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • ज्या लोकांनी मागील चालू वर्षात सरकार दरबारी आय कर भरलेला आहे आशा सर्व व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • व्यवसाय करणारे लोक, वकील, इंजिनिअर, चार्टड अकॉउंटंट, आणि आर्किटेक्ट या लोकांना या योजनेचा फायदा मिळत नाही.

Pm Kisan Samman Nidhi Yojna 2023: आवश्यक कागदपत्र

Pm kisan योजनेचा ज्यांना लाभ ज्यांना घ्यावायची इच्छा आहे आशा लाभार्थ्यांना अर्ज करतेवेळी काही आवश्यक कागदपत्र स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे. ते कागदपत्र पुढील प्रमाणे आहेत.

  • निवासी असल्याचे प्रमाणपत्र (domecile certificate)
  • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र: हे प्रमाणपत्र तुम्हाला online पद्धतीने काढता येऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आपले सरकार ला भेट द्या.
  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड
  • खाते विवरणाची प्रत
  • Income certificate
  • Passport साईझ फोटो
  • बँकेच्या खात्याचे statement

Pm kisan Samman Nidhi Yojana 2023: online registration कसे करावे?

जर तुम्ही शेतकरी असाल आणि अजून पर्यंत तुम्ही pm किसान सम्मान निधी साठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केले नसेल तर आम्ही आज आपल्याला pm किसान सम्मान निधी या योजनेसाठी संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. तुम्ही या लेखातील खाली दिलेल्या स्टेप follow करून या योजनेसाठी यशस्वीपणे रेजिस्ट्रेशन करू शकता.

  •  पी एम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशन साठी सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  •  त्यानंतर तुम्हाला farmars corner नावाने एक विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये new farmer registration या ऑप्शन वर क्लिक करायला लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक form open होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागेल जसे की तुमचे नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, इ. हे सर्व भरून झाल्यावर तुम्हाला submit या बटणावर click करून form सबमिट कराचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या device वर pm kisan registration form उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून तुम्हाला तो form सबमिट करावा लागेल.
  • त्यानंतर आता आपली ही pm kisan रेजिस्ट्रेशन प्रक्रिया संपते. एकदा तुमच्या अर्जला स्वीकृती मिळाल्यावर तुम्हाला सरकार कडून आर्थिक लाभ भेटण्यास सुरुवात होईल.

Pm kisan Samman Nidhi Yojana 2023: स्वीकृती status कसे बघावे

जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी साठी नवीन अर्ज केला असेल तर तुम्ही तर तुम्हाला तुमचे beneficiary status कसे चेक करावे याबद्दल खाली दिलेली माहितीप्रमाणे आपण ते चेक करू शकता.

  • यासाठी तुम्हाला pmkisan.gov. in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही वेबसाईट या योजनेसाठीची अधिकारिक वेबसाईट आहे.
  • त्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या home page वर पोहचाल तिथे तुम्हाला farmer corner मध्ये status of seft register असा option दिसेल. त्यावर तुम्हाला click करायचे आहे.
  • त्या ऑपशन वर click केल्यानंतर तुमच्या समोर status form open होईल तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि एक image कॅपचा भरून तो form submit करायचा आहे.

आता तुमच्या समोर पीएम किसान सम्मान निधी benificiary स्टेटस open होईल ज्यामध्ये तुम्हाला registration केल्याचे संपूर्ण विवरण बघायला मिळेल. आणि तुम्हाला तुमचा अर्जला स्वीकृती मिळाली आहे किंवा नाही हे कळेल. अर्जला स्वीकृती मिळाली नसल्यास तुम्हाला तिथे, तुमच्या अर्जला स्वीकृती का मिळाली नाही याचे कारण बघायला मिळेल. किंवा तुमचा अर्ज जर पेंडिंग असेल तर तो कोठे pending आहे हेसुद्धा कळेल.

आणखी वाचा: (पोकरा योजना) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (PoCRA Scheme) Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana)

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2023: तुमचे नाव list मध्ये कसे बघावे

Pm Kisan Samman Nidhi Yojana मध्ये ज्या लाभार्थ्यांना आपली नावे बघायची आहे त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून आपले नाव list मध्ये चेक करावे.

  • सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईट वर जावे
  • त्यानंतर benifishiary list वरती click करावे.
  • त्यानंतर तुम्हाला एक form open होईल त्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, तहसील, आणि आपल्या गावाचे नाव निवडावे आणि गेट रिपोर्ट या ऑपशन वर क्लिक करावे.

त्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल ज्यांनी pm kisan samman nidhi yojana साठी अर्ज केलेले आहेत आणि ज्यांना स्वीकृती मिळालेली आहे.

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2023: e-KYC

शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी e-KYC करणे हे आवश्यक आणि अनिवार्य करण्यात आले आहे. जर या योजनेसाठी e-KYC केली नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचा लाभ पोहचू शकणार नाही. पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घेण्यासाठी सरकारने e-KYC ची शेवटची तारिक ३१ मे २०२२ अशी ठेवली होती. परंतु ती आता पुढे वाढवण्यात आली आहे.

पीएम किसान पोर्टल वरील अधिकृत सूचनेनुसार शेतकरी बांधव आता ३१ जुलाई २०२२ पर्यंत e-KYC करू शकतात. त्यासाठी आपण खाली दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया करू शकता.

  • e-KYC साठी सर्वात पहिले आपण pmkisan.gov.in ला भेट द्या.
  • तिथे तुम्हाला सर्वात वर e-KYC चा option दिसेल त्यावर तुम्हाला click करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक page open होईल तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही e-KYC करू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांना e-KYC करणे खूप आवश्यक आहे. आणि जर या योजनेसाठी शेतकऱ्यांनी e-KYC करण्याचे टाळले तर त्यांना या pm kisan samman nidhi yojana चा लाभ मिळू शकणार नाही.

आणखी वाचा: Banana Ripening Chamber Subsidy in Marathi

Pm Kisan Samman Nidhi Yojana २०२३: latest update

पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांचा आता १३ व्या हप्त्याचा ला लागणारा विलभ संपलार आहे, बऱ्याच मिडिया report नुसार  पीएम किसान सम्मान निधी योजनेचा १३ व हप्ता २४ फेब्रुवारी ला जारी होण्याची संभावना आहे. परंतु याविषयी कुठलीही आधिकारिक माहिती अजून सरकारतर्फे जारी करण्यात आलेली नाही.परंतु report नुसार या योजनेचा १३ व हप्ता हा २४ फेब्रुवारी २०२३ ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात transfer होईल. कारण या दिवशी पीएम किसान योजनेचे ४ वर्ष पूर्ण होत आहे.

किसान क्रेडीट कार्ड बनविण्याची प्रक्रिया

पीएम किसान सम्मान निधी या योजनेसाठी केंद्र सरकार या योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड म्हणजेच KCC सोबत जोडण्यात येत आहे. या सुविधेमुळे आता शेतकरी बांधव त्यांच्या पिकांची काळजी घेण्यासाठी या किसान क्रेडीट कार्डचा वापर करून loan पण घेऊ शकणार आहेत. यासाठी खालील प्रक्रिया करायची आहे.

  • पीएम किसान सम्मान निधीसाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड साठी बँकेत apply करव लागेल.
  • त्यासाठी लाभार्थी शेतकर्याचे ज्या बँकेत पीएम किसान निधीचे खाते असेल तेथेच तुम्हाला अर्ज करवा लागेल.
  • त्यानंतर तिथे तुम्हाला kcc form भरून द्यावा लागेल.

KCC form download करण्याची प्रक्रिया

  • आधी pm kisan योजनेच्या आधिकारिक website वर जा.
  • होम page वर आपल्याला farmer corner दिसेल त्यांतर्गत download KCC form या लिंक वर click करा.
  • Click केल्या नंतर kcc form open होईल
  • या form ची प्रिंट घेऊन form भरून बँकेत द्यायचा आहे.

पीएम किसान Helpline नंबर

पीएम किसान हेल्पलाईन नंबर १८००११५५२६ याशिवाय तुम्ही कृषी मंत्रालयाला सुद्धा संपर्क करू शकता.

 

Leave a Comment